पुणे नाशिक महामार्गावरील अपघातात नाशिकचे तीन तरुण जागीच ठार
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-पुणे महामार्गावर नांदुर-शिंगोटे येथील चीपाचा नाला या ठिकाणी रात्री 12.30 वाजता आयशर ट्रक (TS-30-T-8886) व चारचाकी (MH-15-TC1721) यांच्यामध्ये भी’ष’ण अपघात झाला.
या अपघातात चारचाकी मधील मेडिकल औषध कंपनीचे एम आर असलेले नाशिक येथील तीन तरुण जागीच ठार झाले.
अपघातग्रस्त चारचाकीमधील भूषण बदान, शरद महाजन, राजेश तिवारी हे तिघेही नाशिक येथील असून पुणे येथून नाशिक कडे येत असताना नांदुर-शिंगोटे येथे हा अपघात झाला.
हे तिघेही मॅनकाइंड या कंपनीत काम करत असल्याचे समजते. या अपघातात तिघे ही जागीच ठार झाले. सदर अपघाताची माहिती नांदूर पोलिसांना समजताच पोलिसांनी जागेवर जाऊन तिघांना वाहनांतून बाहेर काढून दोडी बुद्रुक शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केले. पुढील तपास वावी पोलीस स्टेशनचे सागर कोते करत आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: तलवारीने केक कापायला गेले, सेलिब्रेशन झालं पोलीस कोठडीत..
नाशिक कोर्टात पार्किंगवरून वाद; वकील आणि पोलिसांना धक्काबुक्की: ३ जणांवर गुन्हा दाखल
चांदोरी पाठोपाठ आता ‘येथेही’ बनावट दारू बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई