नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी ४२९४ इतक्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. यात नाशिक शहर: २०८७, नाशिक ग्रामीण: २०२८, मालेगाव: ७७ तर जिल्हा बाह्य: १०२ असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १५, नाशिक ग्रामीण: १५ आणि जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) रविवार कारंजा येथील ६० वर्षीय वृद्ध महिला, २) मखमलाबाद रोड पंचवटी येथील ८० वर्षीय वृद्ध महिला, ३) पंचक, जेलरोड येथील ६१ वर्षीय वृद्ध पुरुष, ४) सातपूर,नाशिक येथील ५४ वर्षीय महिला, ५) संभाजी चौक,आडगाव येथील ६० वर्षीय वृद्ध महिला, ६) १३,श्रीराम दर्शन अपार्टमेंट, पंचवटी,नाशिक येथील ७३ वर्षीय वृद्ध पुरुष, ७) बिडी कामगार वसाहत, अमृतधाम नाशिक येथील ७५ वर्षीय वृद्ध महिला, ८) श्रद्धा संकुल सोसायटी, प्लॉट क्रमांक ११, जेलरोड नाशिक येथील ५७ वर्षीय महिला, ९) लक्ष्मी दर्शन अपार्टमेंट, मातोश्री नगर, उपनगर येथील ८५ वर्षीय वृद्ध पुरुष, १०) डी-२, शिवानंदन बी,पपिंग स्टेशन, नाशिक येथील ७५ वर्षीय वृद्ध महिला, ११) भूमी रो हाऊस, आरटीओ ऑफिस,पेठरोड, नाशिक येथील ६७ वर्षीय वृद्ध पुरुष, १२) वृंदावन, डीजीपी नगर, सिडको,नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध महिला, १३) प्राईड अपार्टमेंट,फ्लॅट क्र ३,राणे नगर, नाशिक येथील ७९ वर्षीय वृद्ध महिला, १४) मोरवाडी, विजयनगर, सिडको, नाशिक येथील ४३ वर्षीय महिला, १५) नासर्डी पूल, पुणे नाशिक रोड, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष असा समावेश आहे.
तर नाशिक जिल्ह्यात शनिवारी ३३९१ इतके रुग्ण बरे झाले आहेत.