रेमडेसीविर व ऑक्सिजन आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू

नाशिक (प्रतिनिधी): मागील वर्षाच्या तुलनेत शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या आरोग्य सुविधा हे जिल्हा प्रशासनाची मोठी उपलब्धी आहे. सध्या जिल्ह्यातील खाजगी रूग्णालयांना कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी लागणारा ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न सुरू असून या परिस्थितीवर मात करण्याचे आवाहन करताना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ‘ब्रेक द चेन’ ची परिणामकारकाता हळूहळू दिसून येत असल्याबद्दल जिल्हा प्रशासन यावर लवकरच मात करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात नाशिक जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना याबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड, अप्पर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या समन्वयक उपजिल्हाधिकारी वासंती माळी, सहआयुक्त दु्ष्यंत भामरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, वैद्यकिय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. अनंत पवार, महानगरपालिकेचे वैद्यकिय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, डॉ.आवेश पलोड यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा:  नाशिक: खाद्यपदार्थात झुरळ टाकून मिठाई व्यावसायिकांना ठगणाऱ्या खंडणीखोराला अटक

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, डॉक्टरांच्या प्रमाणपत्राशिवाय रेमडेसिव्हिरचे वितरण करण्यात येवू नये. तसेच  कोविड रुग्णालयांनी कोरोनाबाधित रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचाराच्या अनुषंगाने रेमडेसिव्हिरची मागणी करावी, जेणेकरुन रुग्णांना आवश्यकतेनुसार रेमडेसिव्हिर उपलब्ध होवून रेमडेसिव्हिरची तूट भासणार नाही. तसेच अनावश्यक साठा होण्यावर देखील आळा बसणार आहे, असे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

बेड उपलब्धतेचा फलक प्रत्येक कोविड रुग्णालयात लावण्यात यावा. नर्सिंग महाविद्यालय, एसएमबीटी व एमव्हीपी महाविद्यालयातून नर्सेसची सेवा घेण्याबाबत नियोजन करण्यात यावेत. खाजगी रुग्णालयांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा वाढवावा आणि रुग्णांच्या आवश्यतेनुसार ऑक्सिजन बेड उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात यावा. त्याप्रमाणे मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने  खाजगी डॉक्टरांनी  सेवा देण्यासाठी पूढे यावे, असे आवाहनही  पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: फायनान्स कंपनीच्या दोन वसुली एजंटवर ज्वलनशील पदार्थाने हल्ला

आरोग्य सुविधांच्या पुरवठ्यासोबतच ‘ब्रेक द चेन’ च्या अंतर्गत लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाची अंमलबजावणी पोलीस यंत्रणेमार्फत योग्य प्रकारे होत आहे. या दुहेरी उपायायोजनाचा परिपाक म्हणून कोरोनाबाधितांचा पॉझिटीव्हीटी रेट कमी होण्यास मदत होत आहे. याअनुषंगाने नागरिकांनी संयम ठेवून कोरोनाच्या त्रिसूत्रीचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

ऑक्सिजन पुरवठ्याचे एक टँकर व 27 ड्युरा सिलेंडर पैकी 7 सिलेंडर प्राप्त झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील कोविडचे उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा होणारा वापर लक्षात घेता, खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा अखंडितपणे पुरवठा होण्यासाठी डॉ. किशोर श्रीवास यांची घटना व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी पालकमंत्री यांना दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: दहावी निकालाच्या आदल्या दिवशीच इमारतीच्या गच्चीवरून ढकलून मुलीचा खून

पोलीस यंत्रणा, महानगरपालिका व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती संबंधित विभाग प्रमुखांनी पालकमंत्री यांना सादर केली.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790