🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

त्र्यंबकला पहाटे ४ वाजेपासून तर सप्तश्रृंगीचे मंदिर २४ तास खुले राहणार

नाशिक। दि. ३० डिसेंबर २०२५: नाताळ, नववर्ष स्वागत, शाकंबरी नवरात्रोत्सव, धनुर्मासामुळे भाविकांची गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वराचे मंदिर पहाटे ४ वाजेपासून खुले राहणार आहे. तर श्री सप्तशृंगी मंदिर २४ तास उघडे राहणार आहे. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीसाठी हा निर्णय घेतल्याचे मंदिर ट्रस्टींनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक-पालघर प्रवासाला मिळणार वेग; NH-160A महामार्गाच्या ३३२० कोटींच्या प्रकल्पास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

५ दिवसात २ लाख भाविकांनी सप्तशृंगी गडावर हजेरी लावली. सरत्या वर्षाला निरोप, नववर्षाच्या स्वागतासाठी भाविक येतात. या गर्दीत वाढ होणार असल्याचे ट्रस्टींनी सांगितले.

दरवर्षीप्रमाणे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हजारो भाविक त्र्यंबकराजाच्या दर्शनाला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्तासह, वाहनतळ व्यवस्था आणि रस्ते वाहतुकीसाठीही नियोजन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790