नाशिक, दि. 28 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम 2025-2026 साठी राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार कडधान्य व तेलबियांची (मूग, उडिद, सोयाबीन व तुर) खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्या विहित कालवाधीत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी आर. एस. इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
आधारभूत किंमत कडधान्य व तेलबिया खरेदी करण्याकरिता ई-पिक पाहणी असलेला 7/12 उतारा आवश्यक आहे. हि खरेदी प्रक्रिया शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडली जाणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790