नाशिक: संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना 10 सप्टेंबरपर्यंत कागदपत्र पूर्ततेची संधी

नाशिक, दि. 26 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा): संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील प्राप्त प्रकरणांबाबत 15 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या बैठकीत मंजूर/ नामंजूर व शकपुर्ततेवरील यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्धी केली आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी साधू- महंतांबरोबर साधला संवाद !

याबाबत अर्जदारास कळवून देखील अर्जदारांनी कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या लाभार्थ्याना पूर्ततेसाठी 10 सप्टेंबर 2025 पर्यंत अंतिम संधी देण्यात येत असून विहित मुदतीत कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन तहसीलदार संजय गांधी निराधार योजना नाशिक शहर उषाराणी देवगुणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: गणेशोत्सवानिमित्त ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान; आरोग्य शिबिरांचे जिल्ह्यात आयोजन

तसेच ज्या लाभार्थ्यांची कागदपत्रे प्राप्त होणार नाहीत अशा लाभार्थी यांना उपरोक्त योजनेची गरज नाही असे समजून सदरची प्रकरणे शासन निर्णयानुसार निर्गमीत करण्यात येणार आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790