नाशिक: दस्त नोंदणीसाठी सुटीच्या दिवशी निबंधक कार्यालये सुरु राहणार

नाशिक (प्रतिनिधी): वार्षिक बाजारमूल्य दर तक्ते दरवर्षी 1 एप्रिल रोजी प्रसिद्धी होत असल्याने तसेच महत्वाच्या सणामुळे दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे.

आर्थिक वर्ष 2024-25 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुद्रांक जिल्हाधिकारी व सर्व दुय्यम निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च 2025 या शासकीय सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत, असे नाशिकचे सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. १० जून) वीजपुरवठा बंद राहणार…

शासकीय सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणीचे काम करून घ्यावे, असे आवाहनही मुद्रांक जिल्हाधिकारी गायकवाड यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790