नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन

नाशिक। दि. २५ ऑक्टोबर २०२५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले.

यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार सुहास कांदे, नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, निफाड उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे आदी उपस्थित होते.

Loading

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांना अटक !
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790