नाशिक जिल्ह्यात 3 लाख 98 हजार हेक्टर क्षेत्रावर ई-पीक पाहणी पूर्ण

नाशिक, दि. २४ सप्टेंबर २०२५ (जिमाका वृत्तसेवा): खरीप हंगाम 2025 करीता शेतकरी स्तरावरून मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी नोंदणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी, दुबार पेरणी या कारणांमुळे शेतकरी ई-पीक नोंदणी पूर्ण न करू शकल्यामुळे आणि ई-पीक नोंदणी करण्यापासून शेतकरी वंचित राहू नये यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात 19 सप्टेंबर 2025 पर्यंत शेतकरी स्तरावर 3 लाख 98 हजार 775 हेक्टर क्षेत्रावर ई-पीक पाहणी पूर्ण झाली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तुकाराम हुलवळे यांनी दिली आहे.

⚡ हे ही वाचा:  राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता; नाशिकला यलो अलर्ट

जिल्ह्यातील नाशिक, सिन्नर, निफाड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, इगतपुरी, येवला, बागलाण, चांदवड, मालेगाव, देवळा, नांदगाव, पेठ व सुरगाणा या 15 तालुक्यात एकूण ई- पीक पाहणी करावयाच्या मालकी क्षेत्राची संख्या 13 लाख 23 हजार 484 इतकी असून त्यापैकी 19 सप्टेंबरपर्यंत पीक पाहणी नोंदविलेल्या मालकी क्षेत्राची संख्या 4 लाख 57 हजार 424 इतकी आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यात ई-पीक पाहणी करावयाचे एकूण क्षेत्र 11 लाख 3 हजार 82 हेक्टर इतके असून यापैकी शेतकरी स्तरावर 3 लाख 98 हजार 775 हेक्टर इतक्या क्षेत्रावर आतापर्यंत ई-पीक पाहणी झाली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपच्या माध्यामतून ई-पीक पाहणी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करावी व आपल्या हक्काचा लाभ निश्चित करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here