नाशिक। दि. २३ सप्टेंबर, २०२५ (जिमाका वृत्तसेवा): शासनाच्या सलोखा योजना व विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 मधील कलम 19 व 3 जानेवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार सलोखा योजनेअंतर्गत अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यातील उपसंचालक भूमी अभिलेख, नाशिक प्रदेश, नाशिक यांच्या स्तरावरील प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी 1 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता भूमी लोक अदालीतीचे आयोजन करण्यात आले आहे.
अपीलदार व समानेवाले अथवा त्यांचे प्राधिकृत प्रतिनिधी यांनी 1 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता हजर राहून लोक अदालत तडजोडनामा अर्ज सादर करावेत, असे आवहन उपसंचालक भूमी अभिलेख, नाशिक प्रदेश, नाशिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790