नाशिक: बालकांच्या नोंदणी नसलेल्या अनधिकृत संस्थांवर होणार कारावाई

नाशिक, दि. 21 मे, 2025: पुणे जिल्ह्यातील आळंदी व ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविले जात असल्याबाबतचे वृत्त प्रकाशित झाले आहे. नागरिकांना अशा प्रकारच्या अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्ह्यातील जिल्हा महिला बालविकास अधिकारी तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पुणे महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

👉 हे ही वाचा:  जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू - कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि सुधारित अधिनियम 2021 मधील कलम 42 नुसार मान्यता तथा नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त नसलेल्या संस्था अथवा अशी संस्था चालविणारी व्यक्तीला 1 वर्ष कारावास तसेच रूपये 1 लाख पेक्षा कमी नसेल एवढा दंड किंवा दोन्हीही करण्याची तरतूद असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790