नाशिक। दि. १८ ऑगस्ट २०२५: महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यामार्फत आर.एम.पी.ए योजनेंतर्गत नाशिक विभागातील उद्योजकांसाठी 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत श्री गुरूगोविंदसिंग इंजिनियरिंग कॉलेज, इंदिरा नगर, नाशिक येथे आयोजित केले आहे.
प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी 20 ऑगस्ट 2025 पर्यंत नोंदणी करून जास्तीत जास्त उद्योजकांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
उद्योजकांना त्यांच्या उद्योगात गती येण्यासाठी तसेच आर्थिक वृद्धी होण्याच्या दृष्टीने आयोजित कार्यशाळेत विविध उद्योगातील आर्थिक साक्षरता कार्यक्रम, डिजिटल कर्ज अर्ज प्रक्रिया कार्यक्रम, जेम पोर्टल टेंडर प्रक्रिया, आणि महिला व अनु.जाती, जमाती क्षमता वृद्धी कार्यक्रम अशा चार प्रकराच्या कार्यशाळा होणार आहेत. सहभाग नोंदणीसाठी उद्यम आधार नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड व पासपोर्ट छायाचित्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक असून 11, उद्योग भवन, सातपूर आय टी आय जवळ, त्र्यंबकरोड, सातपूर नाशिक येथे नोंदणी करावी.
याबाबत अधिक माहितीसाठी अक्षय बैसाणे (भ्रमणध्वनी क्रमांक: 7559119269) यांच्याशी अथवा कार्यालयात संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.