🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: गोदावरी इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे 24 फेब्रुवारी रोजी आयोजन

नाशिक। दि. १६ फेब्रुवारी २०२६: नाशिक जिल्हा प्रशासन, CSRBOX व कुंभथॉन इनोव्हेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “गोदावरी इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह” चे आयोजन 24 फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजेपासून ताज गेटवे हॉटेल, नाशिक येथे करण्यात आले आहे.

शाश्वत विकासासाठी नवकल्पना, भागीदारी व गुंतवणूक वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कार्यक्रमांतर्गत पुढील उपक्रमांचा असणार समावेश:
👉
जिल्हास्तरीय हॅकाथॉन: अभियांत्रिकी व तांत्रिक शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांसाठी शाश्वत विकासाशी संबंधित समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय सादर करण्यासाठी हा हॅकाथॉन आयोजिन केला जात आहे. पाणीसंवर्धन हवामान बदल, कृषी क्षेत्रातील स्मार्ट उपाय, कचरा व्यवस्थापन व पर्यावरण संरक्षण यांसारख्या विषयांवर उपाय विकसित करणाऱ्या संघांमध्ये अंतिम फेरी होईल. विजेत्या संघाचा 2.5 लाख रूपयांपर्यतचे बक्षिस देण्यात येणार असून या कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: घरफोडी प्रकरणी आरोपी अटक; साडेचार लाखांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त

👉 स्टार्टअप एक्सपो: शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन, कृषी नवकल्पना, शहरी व्यवस्थापन व सार्वजनिक सेवा तंत्रज्ञान या क्षेत्रातील स्टार्टअप्सना आपले नाविण्यपूर्ण प्रकल्प सादर करण्याची संधी उपलब्ध होणार असून यामुळे उद्योग, गुंतवणूकदार आणि शासन यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळेल. यात 25/ 30 स्टार्टअप सहभागी होणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरात उष्णतेची झळ वाढली; कमाल तापमान ३२.८ अंशांवर

👉 हितधारक गोलमेज परिषद: शासकीय अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, गुंतवणूकदार, शैक्षणिक संस्था व तज्ज्ञ यांच्या सहभागातून गोलमेज परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेत नाशिक जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी नवकल्पना व गुंतवणूक वाढीसाठी धोरणात्मक चर्चा केली जाईल.

👉 स्टार्टअप क्षमता विकास कार्यशाळा: स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शन, तांत्रिक सल्ला, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रत्यक्ष प्रकल्प संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली जाईल. या कार्यशाळेत शाश्वत विकासाशी संबंधित समस्यांचे व्यावसायिक व प्रभावी उपाय विकसित करण्यावर विशेष भर असेल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक-पालघर प्रवासाला मिळणार वेग; NH-160A महामार्गाच्या ३३२० कोटींच्या प्रकल्पास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

तरी जिल्ह्यातील विद्यार्थी, स्टार्टअप्स, उद्योजक, उद्योग क्षेत्र, गुंतवणूकदार तसेच शैक्षणिक संस्थांनी या कॉन्क्लेव्हमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790