विकसित महाराष्ट्र 2047′ सर्वेक्षण: नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी 17 जुलैपर्यंत आपले मत नोंदवावे

नाशिक। दि. १० जुलै २०२५: राज्य शासनाच्या ‘विकसित महाराष्ट्र 2047’ या दीर्घकालीन दृष्टिकोनावर आधारित व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी राज्यात सर्वेक्षण सुरु आहे. नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी देखील https://wa.link/o93s9m या उपलब्ध करुन देण्यात लिंकवर अथवा दिलेल्या क्यूआर कोडवर 17 जुलै 2025 पर्यंत आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

राज्य शासनाने 100 दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 150 दिवसांचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये ‘विकसित महाराष्ट्र @ 2047’करिता ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे. ‘विकसित महाराष्ट्र 2047 चे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्टे महाराष्ट्र @ 2047, मध्यमकालीन उद्दिष्टे महाराष्ट्र @75 व अल्पकालीन उद्दिष्टे @2029 ठरविण्यात आली आहेत. ‘विकसित महाराष्ट्र -2047’ च्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’ चा मसुदा तयार करण्यासाठी क्षेत्रनिहाय 16 गट स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य, ग्राम विकास, नगरविकास, भूसंपदा, जलसंपदा, पायाभूत सुविधा, वित्त, उद्योग, सेवा, सामाजिक विकास, सुरक्षा, सॉफ्ट पॉवर, तंत्रज्ञान व मानव विकास/ मनुष्यबळ व्यवस्थापन असे हे क्षेत्रनिहाय गट असतील.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी !

राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरिता प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन असे चार प्रमुख आधारस्तंभ निश्चित करण्यात आले आहेत. ‘विकसित महाराष्ट्र- 2047’च्या व्हिजन मध्ये नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण 18 जून 2025 ते 17 जुलै 2025 या कालावधीत होईल.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी वरील लिंकवर अथवा राज्य शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या क्यूआर कोड वरुन व्हॉटस्अप चॅटबॉटद्वारे आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये आपले योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येत नाही, असेही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी कळविले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here