🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक येथील कोशागार कार्यालयातर्फे कार्यशाळेसह पेन्शन अदालतचे आयोजन

नाशिक। दि. ३० ऑक्टोबर २०२५: जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी आणि राज्य शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दुसरा मजला, लेखा कोश भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नाशिक येथे ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत भविष्य निर्वाह निधी कार्यशाळा आणि पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. वरीष्ठ कोशागार अधिकारी सचिन धस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या तरुणाला अटक; मुद्देमाल जप्त !

या कार्यशाळेत महालेखाकार कार्यालय (लेखा व हक्कदारी), मुंबईचे अधिकारी हे भविष्य निर्वाह निधी व निवृत्तीवेतन संबंधित समस्या आणि प्रश्नांच्या निराकरणासाठी उपस्थित राहतील. सकाळच्या सत्रात आहरण व संवितरण अधिकारी व दुपारच्या सत्रात निवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वरीष्ठ कोशागार अधिकारी श्री. धस यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790