नाशिक (प्रतिनिधी): सप्तशृंगगडाच्या शीतकड्यावरून पडून एका युवक आणि युवतीचा मृत्यू झाला. वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भातोडा शिवारात सप्तशृंगगडाच्या दक्षिणेकडील शीतकड्याच्या पायथ्याशी या दोघांचा मृतदेह आढळला होता. ही आत्महत्या आहे की ते दोघे पाय घसरून पडले याची पोलिस चौकशी करत आहेत
भातोडे येथील पोलिस पाटील विजय राऊत यांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा केला. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २६) वणी येथील आदित्य देशमुख (२७) तसेच फोफशी येथील मोनिका शिरसाठ (२४) या दोघांचे मृतदेह आढळले. वणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची वेगवेगळी नोंद झाली आहे.
पोलिसांनुसार मोनिका शिरसाठ बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाइकांनी वणी पोलिस ठाण्यात सोमवारी दिली होती. दोन्ही मृतदेह जवळजवळ सापडले होते. मृतदेह कड्याच्या मध्य भागापासून खाली उतरवून वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. शवविच्छेदनानंतर ते नातेवाइकांच्या ताब्यात दिले.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790