नाशिक: गणेशोत्सवानिमित्त ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान; आरोग्य शिबिरांचे जिल्ह्यात आयोजन

नाशिक। दि. २७ ऑगस्ट २०२५: मुख्यमंत्री सचिवालयातंर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तथा धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई यांच्या समन्वयाने नाशिक जिल्ह्यात 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2025 या कालावधीत समुदाय आरोग्य शिबिर आयोजित केले जाणार आहेत. या शिबिरात नागरिकांना मोफत आरोग्य चिकित्सा व उपाचारार्थ मार्गदर्शन केले जाणार आहे, नागरिक व गरजु रूग्णांनी या शिबिरात सहभागी होवून आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मंजुषा घाटगे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत आयोजित बैठकीत श्रीमती घाटगे बोलत होत्या. यावेळी मुख्यमंत्री सहाय्य निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिकचे कक्ष प्रमुख डॉ. चैतन्य बैरागी, सहाय्यक आयुक्त धर्मादाय आयुक्तालय श्रीमती मटाले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, वैद्यकीय अधिक्षक प्रकाश भोये, आरोग्य विस्तार अधिकारी विठ्ठल पाटील, अति. वैद्यकीय अधिकारी डॉ. नामपूरकर, डॉ. अतुल धामणे, सीएमआरएफच्या जिल्हा समन्वयक डॉ. दीपाली लोढा, जिल्हा समन्वयक (एम.जे.पी.जे.ए.वाय) डॉ. दाभाडे यांच्यासह दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे वैद्यकीय अधिकारी व गणेशमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: आखाड्यांना लवकरच मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देणार- आयुक्त शेखर सिंह

गणेशोत्सवात राबविला जाणारा हा आरोग्य विषयक उपक्रम महत्वाचा असून या उपक्रमात आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संलग्नित विविध वैद्यकीय महाविद्यायतील वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय विद्यार्थी व पॅरा वैद्यकीय कर्मचारी यांची सेवा घेतली जाणार आहे. जिल्ह्यात 42 सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी या शिबिरांचे दिवसा आयोजन करण्याचे नियेाजन असून या शिबिरात रूग्णांची प्राथमिक तपासणी, मोफत रक्त चाचण्या, ईसीजी व अनुषंगिक सर्व तपासणी केली जाणार आहे. यातून ज्या रूग्णांना पुढील उपचारांची गरज आहे, त्यांना आरोग्य विषयक शासकीय योजनांतून उपचारार्थ मार्गदर्शनपर सहाय्य केले जाणार आहे. या उपक्रमांची जनजागृती केली जाणार आहे. शिबिरात आलेल्या नागरिकांची नोंदणी करून त्यांनतर त्यांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करावयाची असल्याचे डॉ. बैरागी यांनी यावेळी सांगितले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: धोकादायकरीत्या उभ्या ट्रकला कारची धडक; तीन वर्षांच्या चिमुकलीसह चौघे जखमी

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानाबाबत वेळोवळी मार्गदर्शनपर सूचना व्हॉट्सॲप ग्रुपवर देण्यात येतील तसेच अभियान यशस्वितेसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आपले योगदान द्यावे, असे तहसीलदार श्रीमती घाटगे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790