नाशिक, दि. 26 ऑगस्ट, 2025: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांच्या वतीने जागेवर निवड संधी (NASHIK PLACMENT DRIVE -3) कार्यक्रमात रोजगाराच्या एकूण 185 जागांसाठी 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11ते दुपारी 2 या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,नाशिक, प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पध्दती इमारत, पहिला मजला, आयटीआय सातपुर परिसर, त्र्यंबकरोड, नाशिक, 422 007 या ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यात महायान ग्लोबल एक्युपमेंटस सोल्युशन प्रा.लि., फिबिटेक सोल्युशन्स प्रा.लि., अभिनव इंस्टीटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या नामांकित कंपन्या रिक्त पदांसाठी नियोजित ठिकाणी उपस्थित राहून प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे.
नियोक्ते व उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या nashikrojgar@gmail.com या ईमेलवर किंवा 0253-2993321 कार्यालयाच्या या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच शासकीय रोजगार मेळाव्यात नियोक्ता व उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सर्व सेवा निशुल्क आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त रिसे यांनी केले आहे.