नाशिक । दि. २४ जून २०२५: नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या थकीत कर वसुलीसाठी अडकवून ठेवलेल्या वाहनांच्या प्रकरणांमध्ये वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी कार्यालयाशी संपर्क केलेला नाही. तसेच वाहन सोडवून नेण्यासाठी हक्कही सांगितलेला नाही . अशा 17 वाहनांचा लिलाव 25 जून 2025 रोजी करण्यात येणार आहे. या वाहनांची माहिती www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात आली आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे
वाहनाचे वयोमान 15 वर्षे पूर्ण असल्यास, वाहन रस्त्यावर वापरण्या योग्य नसल्यास www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर वाहनांचा लिलाव करण्यात येईल. अधिक माहिती साठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेठ रोड, पंचवटी, नाशिक 422009 येथे संपर्क साधावा, असे आवहनही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.