स्टॅण्ड अप इंडिया योजना; नवउद्योजकांनी 10 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन !

नाशिक, दि. 16 सप्टेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत केंद्र शासनाची स्टॅण्ड अप इंडिया योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांसाठी राबविण्यात येते. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांनी या योजनेच्या लाभासाठी 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: त्र्यंबकरोडवर डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

स्टॅण्ड अप इंडिया योजनेच्या लाभासाठी नवउद्योजक अर्जदार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असणे आवश्यक असून महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत कर्ज मंजूर झालेले असावे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी 10 टक्के हिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास या योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रण्ट एण्ड सबसिडी 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील 'या' भागांत शनिवारी (दि. २०) वीजपुरवठा बंद राहणार !

इतर अटी व शर्ती तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नाशिक, सामाजिक न्याय भवन, बी-विंग, दुसरा मजला, नासर्डी पुलाजवळ नाशिक पुणे रोड, नाशिक यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here