नाशिक। दि. १५ ऑक्टोबर २०२६: जनरल स्टाफ ऑफीसर, मुख्यालय, तोफखाना (स्कूल ऑफ आर्टिलरी), देवळाली कॅम्प यांच्यातर्फे अधिसूचित ‘झेड’ (Z) सेक्टरमध्ये 27 ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपयंत जीवंत दारुगोळयाचा वापर करून तोफखान्याची व मैदानी गोळीबाराची प्रात्यक्षिके (Field Firing and Artillery Practice) केली जाणार आहेत.
या गोळीबाराच्या सरावामुळे नाशिक तालुक्यातील गावांच्या महसुली हद्दीतील काही भाग तोफांच्या मारा रेषेत येत आहे. या गावातील ग्रामस्थांनी या परिसरात जाऊ नये, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
नाशिक तालुक्यातील वंजारवाडी, लहवित रेल्वे स्टेशन व लोह शिंगवे, इगतपूरी तालुक्यातील घोटीची वाडी, घोटी खुर्द, नांदगांव, नांदुर वैद्य, साकुर, बेलगांव कुऱ्हे, अस्वली रेल्वे स्टेशन, घोटी खुर्द या महसुली गावांच्या हद्दीतील काही भाग तोफांच्या माऱा रेषेत येत आहेत. युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना यांचा सराव अधिनियम,१९३८ च्या कलम १० (२) अन्वये मिळालेल्या अधिकारानुसार, वरील दिवशी आणि ठरवलेल्या वेळी (27 ऑक्टोबर 2026 स. ८. ते दु. १६.), कोणत्याही व्यक्तीने सदर धोक्याच्या हद्दीत प्रवेश करू नये, कोणास जाऊ देऊ नये तसेच आपली पाळीव जनावरे त्या क्षेत्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
या प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवाना प्रवेश केल्यास किंवा संबंधित व्यक्तीविरुध्द कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल (कलम १२ नुसार दंडनीय अपराध). तसेच नियम मोडून प्रवेश केल्यामुळे जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास त्याची जबाबदारी शासनावर राहणार नाही, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही अपर जिल्हादंडाधिकारी श्री. राजपूत यांनी म्हटले आहे.
![]()


