महत्वाची बातमी: सप्तशृंगी–नांदुरी रस्त्यावर एकेरी वाहतूक लागू

नाशिक। दि. १२ जानेवारी २०२६: सप्तशृंगी गड ते नांदुरी या रस्त्यावर सुरू असलेल्या रस्त्याचे व्हाइट टॅपिंग तसेच व्हॅली साइड रिटेनिंग वॉलच्या कामामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व सुरक्षितेच्या दृष्टीने 12 जानेवारी ते 15 मार्च 2026 पर्यंत नियंत्रित वेळापत्रकानुसार सप्तशृंगी–नांदुरी रस्त्यावर एकेरी वाहतूक व्यवस्था (Only One Way Traffic) लागू करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (कळवण) डॉ. कश्मिरा संखे यांनी दिले आहेत.

सदर रस्ता हा डोंगराळ भागातून जात असून, रस्त्याची रुंदी मर्यादित, तीव्र वळणे व उतार-चढाव असल्याने कामाच्या कालावधीत दुहेरी वाहतूक करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. रस्त्याचे काम दर्जेदार व सुरक्षित होण्यासाठी काँक्रिट टाकल्यानंतर आवश्यक क्युअरिंग कालावधी पूर्ण होणे गरजेचे आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील 'या' वाहतूक मार्गांत आज (दि. ११) महत्वाचे बदल

या कालावधीत कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरू ठेवल्यास रस्त्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. सण-उत्सवांच्या काळात भाविकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी (Traffic Jam) निर्माण होण्याचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासनाच्या आदेशानुसार, नियंत्रित वेळापत्रकानुसार वाहतूक सोडण्यात येणार असून, नांदुरीकडे आणि नांदुरीहून सप्तशृंगीकडे जाणारी वाहतूक ठराविक वेळेच्या अंतराने सुरू करण्यात येणार असून दरम्यान आवश्यक ‘क्लिअर टाईम’ ठेवण्यात येणार आहे.

तथापि, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, पोलीस वाहने, दैनंदिन आपत्कालीन सेवा, शालेय विद्यार्थ्यांच्या बसेस आदी अत्यावश्यक सेवांना परिस्थितीनुसार तत्काळ मार्ग मोकळा करून देण्यात येणार आहे सप्तशृंगी गड ट्रस्ट, ग्रामपंचायत सप्तशृंगी गड व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून शिस्तबद्ध व सुरक्षित पद्धतीने वाहतूक नियंत्रण करावे, तसेच कोणतीही वित्तीय अथवा जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: नोकरीचे आमिष दाखवत महिलेसह चौघांना ३२ लाखांचा गंडा

असे आहे वेळापत्रक:
सकाळ सत्रात:
नांदुरी ते सप्तश्रृंगी गड – सकाळी 6 ते 6.30, 8 ते 8.30, 10 ते 10.30
सप्तश्रृंगी गड ते नांदुरी – सकाळी 7 ते 7.30, 9 ते 9.30, 11 ते 11.30

दुपार सत्रात:
नांदुरी ते सप्तश्रृंगी गड – दुपारी 12 ते 12.30, 2 ते 2.30
सप्तश्रृंगी गड ते नांदुरी – दुपारी 1 ते 1.30, 3 ते 3.30

⚡ हे ही वाचा:  नाशिक: कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजनाला गती; डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर

संध्याकाळ सत्रात:
नांदुरी ते सप्तश्रृंगी गड – 4 ते 4.30, 6 ते 6.30, 8 ते 8.30 व 10 ते 10.30
सप्तश्रृंगी गड ते नांदुरी – 5 ते 5.30, 7 ते 7.30, 9 ते 9.30, 11 ते 11.30

रात्र सत्रात:
नांदुरी ते सप्तश्रृंगी गड: रात्री 12 ते 12.30, 2 ते 2.30, 4 ते 4.30
सप्तश्रृंगी गड ते नांदुरी: रात्री 1 ते 1.30, 3 ते 3.30, 5 ते 5.30

प्रवास कालावधी हा 30 मिनिटांचा आहे. प्रत्येक सत्रानंतर 30 मिनिटे प्रवास पुर्ण होण्यासाठी क्लिअर टाईम असणार आहे. एका वेळेस फक्त एकाच दिशेने वाहतुक चालु राहील व गाडी पोहचेपर्यंत विरूद्ध दिशेची वाहतुक थांबलेली राहिल असे आदेशात नमूद आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790