नाशिक। दि. ८ नोव्हेंबर २०२५: नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह हे सोमवार आणि गुरुवारी दुपारी १२ ते २ या कालावधीत सर्व अभ्यागतांना भेटू शकणार आहेत. त्यानुसार व्यक्ती, संस्था यांनी भेटीचे नियोजन करावे, असे आवाहन कुंभमेळा प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी प्राधिकरणाचे कार्यालय सतत कार्यरत आहे. कुंभमेळ्याशी संबंधित विविध कामकाजासाठी स्वयंसेवी संघटना, नागरिक गट, धार्मिक संस्था, कॉर्पोरेट प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, अभ्यासक, स्वयंसेवक तसेच सामान्य नागरिक आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात येतात. मात्र, आयुक्त श्री. सिंह हे पूर्व नियोजित आढावा बैठक, क्षेत्रीय दौरे, उच्चस्तरीय बैठका तसेच तात्कालिक शासकीय कामकाजामुळे अभ्यागतांना भेटणे शक्य होत नाही.
या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी भेटीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार आयुक्त श्री. सिंह हे सोमवार आणि गुरुवार या दिवशी दुपारी १२ ते २ या कालावधीत सर्व अभ्यागतांना भेटू शकतात. त्यासाठी अभ्यागत व्यक्ती आणि संस्थांनी दूरध्वनी क्रमांक ०२५३- २९७७३७५ यावर सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत किंवा ई मेल आयडी kumbhmela.2027@maha.gov.in यावर संपर्क साधावा.
संपर्क साधताना आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, संस्था, गटाचे नाव (असल्यास), भेटीचा विषय (उदा. रस्ते, पाणी, सुरक्षा, परवानगी, स्वयंसेवा), अपेक्षित चर्चेचा कालावधी (१५ ते ३० मिनिटे), सोबत येणाऱ्या व्यक्तींची संख्या (कमाल ३) आदींची माहिती द्यावी. नियोजित वेळेत बदल झाल्यास ई मेल, एसएमएस याद्वारे संबंधितांना पूर्व सूचना देण्यात येईल. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी नागरिक, संस्थांनी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
![]()
