नाशिक, दि. 4 सप्टेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या शासकीय वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थांसाठी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलवर 15 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
वसतिगृह प्रवेशासाठी रिक्त जागा तपशिल
1. मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, युनिट क्र.1 आडगाव नाशिक वसतिगृह- 44 रिक्त जागा.
2. मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट क्र.2 आडगाव,नाशिक वसतिगृह- 36 रिक्त जागा
3. मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, युनिट क्र.3 आडगाव, नाशिक वसतिगृह- 51 जागा
4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह (जुने) आडगाव, नाशिक वसतिगृह-18 जागा
5. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, युनिट क्र.4, नासर्डी पूल, नाशिक वसतिगृह- 39 जागा
6. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (जुने) नासर्डी पूल, नाशिक वसतिगृह-19 जागा
7. 125 जयंती मुलींचे शासकीय वसतिगृह, के.के.वाघ, जवळ, पंचवटी, नाशिक वसतिगृह- 51 जागा
8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, मालेगाव, जि.नाशिक वसतिगृह- 7 जागा
9. आर्थिकदृष्ट्या व मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, मालेगाव, जि.नाशिक वसतिगृह- 3 जागा
10. मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, रसलपूर, ता.निफाड, जि.नाशिक वसतिगृह-10 जागा
11. मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बाभूळगाव, ता.येवला, जि.नाशिक वसतिगृह- 2 जागा
अशा एकूण 284 रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच या वर्षापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी वसतिगृहाचा अर्ज करणे आवश्यक आहे. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या व योजनेच्या निकषाप्रमाणे पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाच स्वाधार योजनेचा लाभ अनुज्ञेय असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेश अर्ज भरावा.
याबाबत अधिक माहितीसाठी संबंधीत गृहप्रमुख/ गृहपाल व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक, नासर्डी पुल, नाशिक येथे संपर्क करावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790