नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला आहे.बजरंग वाडी (नाशिक पुणे रोड) येथे 20 वर्षीय गरोदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेला हृदयविकाराचा त्रास होता. त्यांना 2 मे 2020 रोजी अत्यवस्थ असताना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच अवघ्या दोन तासात मृत्यू झाला. या महिलेचा मृत्यू 2 मे 2020 रोजीच झाला होता, त्यांचा स्वाबचा अहवाल आज (दि. 5 मे 2020) प्राप्त झाला आणि तो कोरोना पॉझिटीव्ह आहे.
त्याचप्रमाणे येवला, सटाणा, आणि सिन्नर येथेही प्रत्येकी एक रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता आता वाढली आहे. आज (दि. 5 मे 2020) सकाळी आठ वाजता नवीन अहवाल प्राप्त झाले. यात एकूण 80 पैकी 5 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यात 4 नवीन पॉझिटीव्ह आहेत तर 1 दुबार चाचणीतही पॉझिटीव्ह आला आहे. या चार नवीन रुग्णांमध्ये सटाणा, फुले नगर येथील 57 वर्षीय पुरुष, सिन्नरच्या वडगाव आव्हाड मळा येथी 34 वर्षीय महिला आणि येवला येथील 27 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. तर बजरंग वाडी येथील महिलेचा मृत्यूपश्चात अहवाल पॉझिटीव्ह आला.
आतापर्यंतची एकूण आकडेवारी:
नाशिक महापालिका क्षेत्र: 18 (1 मृत्यू)
नाशिक ग्रामीण: 27
मालेगाव: 332
अन्य: 6
जिल्ह्यातील एकूण संख्या: 383