नाशिकमध्ये जीवनावश्यक आस्थापनांवर सुद्धा वेळेचे बंधन; जाणून घ्या सविस्तर

नाशिक (प्रतिनिधी): कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता  ‘ब्रेक द चेन’ च्या अंतर्गत राज्य शासनाने कडक निर्बंधांचे आदेश जारी केलेले आहे. या शासन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व नागरिकांच्या विनाकारण फिरण्यावर आळा घालण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर वेळेचे बंधन घालण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी एका शासकीय आदेशान्वये दिली आहे.

ब्रेक द चेन’ या शासन आदेशानुसार जीवनावश्यक वस्तुंच्या आस्थापना वगळता इतर बाबींचे आस्थापना बंद करण्याचे आदेश यापूर्वी पारित केलेले आहेत. तसेच सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते रात्री 08.00 आणि शुक्रवारी रात्री 8.00 ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपर्यंत या कालावधीत योग्य कारणाशिवाय व परवानगी शिवाय कोणत्याही व्यक्तीस फिरण्यास मनाई करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने जीवनाश्यक बाबींवर काही वेळेचे बंधन असणे आवश्यक असल्याची बाब आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये चर्चिली गेली. त्याप्रमाणे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व्यवस्थित रित्या उपलब्ध होतील व त्याचबरोबर संचारबंदी काळात नागरिक कोणत्याही कारणाने बाहेर पडणार नाहीत याचा योग्य मेळ साधून जीवनावश्यक बाबींच्या दुकानांवर सुद्धा वेळेबाबत काही निर्बंध लावण्याचे बैठकीत ठरले.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात 1 कोटीचा गुटखा जप्त; इगतपुरी पोलीसांची मोठी कामगिरी

जीवनावश्यक आस्थांपनावर असे असतील निर्बंध
जीवनाश्यक वस्तुंची सर्व दुकाने , आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते रात्री 08.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र मेडीकल,वैद्यकीय आस्थापना 24 तास सेवा पुरवू शकतील.

किराणा व भूसार मालाची दुकाने शनिवारी व रविवारी पुर्णत : बंद राहतील. ज्या किराणा दुकानांमधुन दुध अथवा भाजीपाला विकला जातो अशी दुकाने बंद ठेवुन त्या दुकानांचे समोरच्या जागेत टेबलद्वारे दुध व भाजीपाला विकण्यास संबंधित दुकानदारास परवानगी राहणार आहे. तसेच पुर्णपणे केवळ दुध भाजीपाला विकणारी दुकाने शनिवारी व रविवारी सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या वेळेत सुरु राहतील.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात 1 कोटीचा गुटखा जप्त; इगतपुरी पोलीसांची मोठी कामगिरी

पावसाळी पूर्व आणि पूर्व हंगामी शेती क्षेत्रातील कामे सुरु ठेवणे आवश्यक असल्यामुळे शेती निविष्ठा आणि अवजारे यांच्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या वेळेत सुरु असतील .

अत्यावश्यक सेवेतील वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक व्यवस्था सुरु ठेवण्यात आली असल्यामुळे या क्षेत्राचे निगडीत टायर विक्री , रिपेअर वर्कशॉप , सर्विस सेंटर आणि स्पेअरपार्ट विक्री आस्थापना सर्व दिवस (आठवडाभर) सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या वेळेत सुरु राहतील, त्यासाठी  त्यांना संबंधित पोलीस स्टेशनची परवानगी आवश्यक असणार आहे . मात्र वाशिंग सेंटर आणि कार डेकोर इतर संबंधित आस्थापना बंद असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात 1 कोटीचा गुटखा जप्त; इगतपुरी पोलीसांची मोठी कामगिरी

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790