नाशिक (प्रतिनिधी): बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा हा कायम असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आगामी दोन ते तीन दिवस विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
या जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याने या परिसरात नागपूर वेधशाळेने यलो अलर्ट घोषित केला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आगामी दोन दिवस मध्यम पावसाचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा, पुणे, जळगाव, सांगली या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790