BREAKING: नाशिक जिल्ह्यात आढळले ‘डेल्टा’ व्हेरियंटचे इतके रुग्ण !
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये डेल्टा व्हेरियंटचे ३० रुग्ण सापडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या रुग्णांमध्ये १ रुग्ण हा नाशिक शहरातील तर, उर्वरित वेगवेगळ्या तालुक्यांतील असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. एकूण १५५ नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.
त्यापैकी ३० नमुने हे डेल्टाचे आढळून आले आहेत. नाशिकमध्ये निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णयाला आठवडा उलटत नाही तोच, आता डेल्टा चे संकट आल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग मात्र चांगलाच सतर्क झाला आहे. यातील बहुतांशी रुग्ण हे ग्रामीण भागातील असले तरीही शहरातही प्रत्येक नागरिकाने अत्यंत काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याचप्रमाणे सध्या आढळून आलेल्या डेल्टाच्या रुग्णांकडे बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.
नाशिकच्या ह्या बातम्या तुम्ही वाचल्या का ?
नाशिक: सराफ व्यावसायिकाचे अपहरण करत तलवारीचा धाक दाखवून ७ लाख लुटले
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ६ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू