🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुऱ्हाडीचे घाव घालत हत्या; पतीनेही…

नाशिक (प्रतिनिधी): सुरगाणा तालुक्यातील श्रीभुवन येथे पतीने पत्नी वर कुऱ्हाडीने वार करून निघृण हत्या करीत घरातून पळ काढत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत मयत आरोपीचा मुलगा लक्ष्मण दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे वडील मनोहर शिवाजी दळवी वय ५१, आई जयवंता मनोहर दळवी वय ४७ या पती- पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून नेहमीच वाद होत असत.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: पाणी, स्वच्छता व स्वच्छतागृह व्यवस्थापनासाठी तांत्रिक सल्लागार समितीची स्थापना

वडीलांना दारुचे व्यसन असल्याने दोघांमध्ये भांडण होत असे. एकमेकांना वारंवार शिवीगाळ करीत असत.

एक सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान आई चुलीवर स्वयंपाक करीत असतांना दोघांमध्ये भांडण झाले त्याच वेळी वडिलांनी घरातील कुऱ्हाडीने आईच्या मानेवर उजव्या बाजूला कुऱ्हाडीने वार करीत गंभीर जखमी केले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: पाणी, स्वच्छता व स्वच्छतागृह व्यवस्थापनासाठी तांत्रिक सल्लागार समितीची स्थापना

जागेवरून पळ काढला. आई चुली जवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. चुली जवळ अक्षरश: रक्ताचा सडा पडला होता.

आईला तात्काळ सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालय केले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी मृत्य घोषित केले. याच दरम्यान वडिलांनी आमच्याच पायरीचा माळ या शेतात जाऊन भीती पोटी सादड्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: पाणी, स्वच्छता व स्वच्छतागृह व्यवस्थापनासाठी तांत्रिक सल्लागार समितीची स्थापना

पत्नी पत्नीवर एकाच चितेवर अग्नी डाग देण्याची वेळ कुटुंबावर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. संशयाची सुई पती पत्नीचा जीव घेई, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील आहेर हे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790