नाशिक। दि. ४ ऑक्टोबर २०२५: धक्का लागल्याच्या कारणातून मित्राला मारहाण करणाऱ्यांना समजावण्यास गेलेल्या तरुणाचा चॉपरने वार करत खून करणाऱ्या चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. शुक्रवारी (दि. ३) जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर. एन. पांढरे यांनी ही शिक्षा सुनावली. मयूर शिवचरण, अथर्व निसाळ, सौरभ देशमुख, सूरज उर्फ बॉबी गांगुर्डे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, १८ मे २०२२ रोजी रात्री १० वाजता सावरकर गार्डन रस्त्यावर हा प्रकार घडला होता. याबाबत विकास गांगुर्डेने फिर्याद दिली. वरील आरोपींनी अविनाश शिंदे यास धक्का लागण्याच्या कारणातून मारहाण केली.
यश उर्फ किरण रामचंद्र गांगुर्डे (रा. म्हसरुळ) व रोहित पवार हे दोघे समजावण्यास गेले होते. त्यावेळी आरोपी शिवचरणने यश गांगुर्डेवर चॉपरने वार केला. व इतरांनी केलेल्या बेदम मारहाणीत यश गांगुर्डेचा मृत्यू झाला. तत्कालीन निरीक्षक अशोक साखरे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे भानुप्रिया पेटकर यांनी कामकाज पाहिले.
![]()

