नाशिक: जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्षातील दुरध्वनी कार्यान्वित

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक संदर्भातील तक्रारींची नोंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थापित केलेल्या आचारसंहिता कक्षातील 0253-2995671 आणि 0253-2995673   हे दोन दूरध्वनी कार्यान्वित झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी कळविली आहे. 

यासोबतच जिल्हा प्रशासनाने 1950 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे. या टोल फ्री क्रमांकावर कॅाल करून नागरिकांना मतदानाची तारीख जाणून घेणे, मतदानाची वेळ माहित करून घेणे, मतदार यादीत नाव शोधणे, मतदान केंद्राचा सविस्तर तपशील जाणून घेणे, मतदार नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया, मतदानासाठी आवश्यक असलेले निवडणूक ओळखपत्रा- व्यतिरिक्त निवडणूक आयोगाकडून विहीत केलेल्या इतर 12 ओळखपत्रांची माहिती घेणे यासारख्या विषयांवर चौकशी करता येईल.  नागरिक या टोल फ्री क्रमांकावर डायल करून तक्रार नोंदवू शकतात. हा टोल फ्री क्रमांक 24 तास कार्यरत राहणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790