नाशिक (जिल्हा प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि.४ ऑगस्ट) एकूण ४६८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात ग्रामीण ७२, नाशिक शहर ३९३, मालेगाव ०३, जिल्हा बाह्य ० अशा रुग्णांचा समावेश आहे. तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण १२ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रात ९, मालेगावमध्ये ० तर नाशिक ग्रामीणमध्ये ३ मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ५०३ रुग्ण बरे झाले आहेत.
त्यामुळे आता नाशिक महानगरपालिका क्षेत्रात: आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५००, एकूण कोरोना रुग्ण:-११५६५, एकूण मृत्यू:-३०९ (आजचे मृत्यू ०९), घरी सोडलेले रुग्ण :- ८१३८, उपचार घेत असलेले रुग्ण:- ३११८ अशी संख्या झाली आहे.
नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) गांधीनगर, नाशिक येथील ७१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) नवनाथ नगर, नाशिक येथील ५३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३)पाराशरे वाडा, नाशिक येथील ५३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) शिंगाडा तलाव, नाशिक येथील ५९ वर्षीय पुरुषाचे निधन झालेले आहे. ५) सारडा सर्कल, नाशिक येथील ७० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) सदभावना चौक, सिडको, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) अण्णाभाऊ साठे नगर, नाशिक येथील ५० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) राणे नगर, नाशिक येथील ७३ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ९)चेहडी पंपिंग, नाशिक रोड येथील २४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790