नाशिक: बस व ट्रकची समोरासमोर धडक; ८ ते १० जण जखमी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक मुंबई महामार्गावर वाडीवऱ्हे जवळील व्हीटीसी फाट्याजवळ सोमवार ( ता. १२ रोजी ) सकाळी एसटी बस आणि ट्रकची समोरा समोर धडक झाल्याने मोठा अपघात झाला. यात अपघातात आठ ते दहा प्रवासी जखमी झाले असुन ही बस नाशिकहून कसाराकडे जात होती.

बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला असुन या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला तर बसमधील चालक वाहकासह आठ ते दहा प्रवासी जखमी झाले आहेत.

या घटनेत घोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय देवराम सदावर्ते (वय ५१ रा. घोटी ग्रामीण रुग्णालय), बसचा चालक दयाराम निवृत्ती सहाणे (वय ४५ रा. पाथर्डी फाटा), तेजस निवृत्ती पगार (वय ४२ रा. नाशिक), मोहन रामराव वाघमारे (वय ४४ रा. शिवाजीनगर सातपूर), कुंदन वसंतराव पाटील (वय ३१), प्रतिमा दिघे रा. नाशिक आणि ट्रक ड्रायव्हर जखमी झाले आहेत.

बस ही इगतपुरी डेपोची असुन अपघाताची माहिती मिळताच जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन सर्व जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790