नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गावरील देवगाव फाटा नजिक पेठ आगाराची एमएच १४ बीटी ४२०८ ही बस पेठकडून-नाशिककडे जात असतांना एका आयशरने धडक दिल्याने २५ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकहून पेठकडे जाणारा आयशर ट्रक क्रमांक एमएच ०४ एफपी १०५२ भरधाव वेगाने ओव्हरटेक करीत असतांना वाहन अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाले. या आयशर ट्रकने बसला धडक दिल्याने बसमधील प्रवाशांतील बहुतांश विद्यार्थी जखमी झाले. यामध्ये बसचालक व्यंकटी विठ्ठलराव गिते व ट्रक चालक रामेश्वर पाटील, वसंत दहिले (वय २५) रा.झार्ली, निर्मला अलबाल (वय ३२) हे गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकला रवाना करण्यात आले.
तर बसमधील गंगुबाई मिसाळ (वय ६०) गब्बरशहा फकीर (वय ४६) अनिकेत भोये (वय १२) अश्विनी पागे (वय १०) आदित्य ठेपणे (वय १३) नेहा गांगुर्डे , विशाल ठाकरे (वय १७) सागर वाघेरे (वय १९) वंदना राऊत (वय ३५) दिवाकर राऊत (वय ३८) नम्रता राऊत (वय १७) मनिषा टोपले (वय २३) धनराज जोगारे (वय ३५) मंगला बागुल (वय ३५) ममता शिंगाडे (वय ५०) विठाबाई कडाळे (वय ६०) हेमंत भुसारे (वय २६) अजित तुंबडे (वय १२) भिमाबाई भुसारे (वय ६०) विमल जाधव (वय ५०) हे जखमी झाले आहेत.
![]()


