नाशिक: दुचाकीवरून ट्रिपल सीट जाताना भीषण अपघात; दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई-नाशिक महामार्गावरील इगतपुरीजवळ आज (दि.२४) रोजी सकाळच्या सुमारास साई कुटीर परिसरात ट्रिपल सीट असणाऱ्या दुचाकीस्वाराचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रिपल सीट दुचाकीस्वार मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात होते. यावेळी दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी बॅरिगेड तोडून पुढे चालणाऱ्या ट्रकवर पाठीमागून जाऊन जोरदार आदळली.

या अपघातात दुचाकीवरील समाधान देवराम भगत, सचिन कचरू पथवे, रा. धार्णोली वैतरणा हे दोघे जण जागीच ठार झाले. तर भाऊ भगत रा. खंबाळे हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच दुचाकीवरील हे तिघेही महिंद्रा कंपनीचे कामगार असल्याचे समजते.

दरम्यान,अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, महामार्ग सुरक्षा पोलीस उपनिरीक्षक हरी राऊत, पोलीस हवालदार विजय रुद्रे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलीसांनी दोन्ही मयत व जखमीला टोल नाक्याच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी घटनास्थळी काही काळ वाहतुक ठप्प झाली होती. मात्र पोलीसांनी तत्परतेने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजुला करून वाहतुक सुरळीत केली. तर याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790