नाशिक शहरात या वेळेत सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास नागरिकांना मनाई…

नाशिक (प्रतिनिधी): कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भावामूळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गं’भीर परिस्थिती निर्माण होवू नये, या करिता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात 1 जून ते 15 जून 2021 पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (1)(3) लागू करण्यात आले आहे.

त्यानुसार नागरिकांना दु. 3 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. आवश्यक अनुज्ञेय कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी ओळखपत्र व सबळ पुरावे सोबत ठेवावे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: बँकेतून बोलत असल्याचे भासवत ७ लाख रुपयांचा गंडा

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी  मांढरे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी म्हणून शासनाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार व 31 मे 2021रोजीच्या राज्य शासनाने पारीत केलेले आदेशातील निर्बंध तसेच या आदेशातील लागू केलेले सर्व निर्बंध काही अटी व शर्तींचे अधीन राहुन  जून, 2021 रोजी सकाळी 07.00 ते 15 जून, 2021 सकाळी 07.00 वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनांचा भाग म्हणून  जिल्ह्यात 1 जून ते 15 जून 2021 पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (1)(3) लागू करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी  मांढरे यांनी या आदेशात नमूद केले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

जर तुम्हाला दुपारी ३ ते सकाळी ६ च्या दरम्यान बाहेर जायचे असेल तर.. :
आदेशान्वये नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात 1 जून ते 15 जून 2021 या कालावधीत दररोज दु. 3 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई असेल. अत्यावश्यक व अनुज्ञेय बाबींशी निगडीत व्यक्तींनी बाहेर पडतांना फोटो ओळखपत्र तसेच बाहेर पडण्याचे अनुज्ञेय बाबीसंदर्भातील सबळ पुरावादर्शक कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नाशिक यांनी 31 मे 2021 नुसार ठरवून दिलेल्या अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा व आस्थापना वगळून इतर  सर्व आस्थापना व सेवा ठरवून दिलेल्या वेळेतच सुरु राहतील. तसेच सर्व खाजगी व शासकीय आस्थापनांना  सार्वजनिक, खाजगी बस वाहतूक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने नागरिकांना परवानगी दिलेल्या कामासाठी अनुज्ञेय राहील. तथापि, यासाठी पूर्वी दिलेल्या निर्देशाचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: छतावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी महावितरणतर्फे मोफत नेट मीटर

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था किंवा समुहांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड विधानचे कलम 188 तसेच प्रचलित कायद्यातील तरतूदीनुसार शिक्षेस पात्र राहणार असल्याचेही, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या आदेशात नमूद केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790