🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक ते दिल्ली सायंकाळी आता अतिरिक्त विमानसेवा

नाशिक। दि. ०४ ऑक्टोबर २०२५: इंडिगोने दुसरी विमान सेवा येत्या २६ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही सेवा सायंकाळी असल्याने दिल्लीत सायंकाळपर्यंत संपेल त्यांना नाशिकमध्ये त्याच दिवशी रात्री परतणे शक्य होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 27 फेब्रुवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

सध्या सुरू असलेल्या सेवेत सकाळी ६.२५ वाजता दिल्लीहून निघालेले इंडिगोचे विमान नाशिकच्या ओझर विमानतळावर सकाळी ८.२० वाजता पोहोचते. त्यानंतर ओझर विमानतळावरून ते सकाळी ९ वाजता रवाना होते आणि दिल्ली येथे सकाळी १०.५५ वाजता पोहोचते. परंतु दिवसभर काम झाल्यानंतर नाशिकला पुन्हा परतायचे असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळच्या विमानाची वाट पहावी लागत असे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत नागरिकांना लुटणाऱ्या इराणीला अटक; १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

नवीन वेळ अशी:
ठिकाण निघणे (वेळ) पोहोचणे दिल्ली सायं. ६.२५ रात्री ८.२०
नाशिक रात्री ८.५० रात्री १०.३५

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790