नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून एका वृद्धास ६० लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी माहिती दिली की, फिर्यादी अमरनाथ मोरे (६२, रा. भाभानगर) यांना संशयित सर्व्हिस प्रोव्हायडर व फायनान्शिअल सर्व्हिस लिमिटेड नावाच्या वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून लिंक मिळाली. त्यातून शेअर मार्केट ट्रेडिंगद्वारे नफ्याचे आमिष दाखवले. त्यानंतर संशयितांनी मोरे यांना वेगवेगळ्या बँक खातेधारकांच्या खात्यांवर ६० लाख पैसे जमा करण्यास सांगितले.
त्याच वेळेस मोरे यांचा नफा एक कोटीपर्यंत गेल्याचे बनावट अॅपद्वारे दाखवले जात होते. मोरे यांनी रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने व्हॉट्सअॅप ग्रुप बंद केला. त्यानंतर मोरे यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.