नाशिक। दि. ११ जानेवारी २०२६: सोशल मीडिया फ्रेंडकडून रेल्वेमध्ये नोकरीचे ऑनलाइन बोगस नियुक्तीपत्र पाठवत महिलेसह चार व्यक्तींना ३२ लाख ९८ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत महिलेने तक्रार दिली. डिसेंबर २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. व्यक्तीने ओळख वाढवत रेल्वेमध्ये रिक्रूटमेंट बोर्डमध्ये नोकरी असल्याची जाहिरात पाठवली. रेल्वेमध्ये मोठे अधिकारी ओळखीचे आहेत असे सांगत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दिले.
महिलेने नोकरी करीता अर्ज केला. संशयिताने ऑनलाईन पैसे भरण्यास सांगीतले. महिलेने सुरवातीला ५ लाख दिले. संशयिताने आणखी कोणी असेल तर सांगा त्यांचेही काम करुन देतो. महिलेने तीच्या ओळखीचे आणखी ४ व्यक्तींना नोकरीविषयी कल्पना दिली.
संशयिताने चार व्यक्ती आणि महिलेकडून वेळोवेळी ३२ लाख ९८ हजारांची रक्कम घेतली. बोगस नियुक्तीपत्रे पाठवले. महिला व तीचे ओळखीचे व्यक्ती जॉईन होण्याकरता झारखंड येथे गेले असता नियुक्ती पत्र बोगस असल्याचे समजले.
![]()


