नाशिक। दि. ४ ऑक्टोबर २०२५: शेअर ट्रेडिंगमध्ये जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सेवानिवृत्त वृद्धाला सायबर भामट्याने साडेचार लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे घरी असताना मोबाईल क्रमांकावरून अज्ञात इसमाने त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून व्हॉट्सअॅप ग्रुपला जॉईन होण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने ग्रुप जॉईन केल्यानंतर त्यावरून फिर्यादीला ऑनलाईन स्टॉक मार्केट ट्रेडिंगच्या बहाण्याने जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
वेगवेगळ्या बँक खात्यांवर आरोपीने साडेचार लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले; मात्र ही रक्कम गुंतवूनही नफा व मूळ रक्कम परत मिळत नसल्याने आर्थिक फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने गंगापूर पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली आहे.
![]()

