Amazon

नाशिकरोडमधील गुन्हेगारी टोळीला मकोकाचा दणका; टोळीप्रमुखासह चौघांवर कारवाई

नाशिक। दि. १७ ऑक्टोबर २०२६: नाशिकरोड परिसरातील संघटित गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी एका गुन्हेगारी टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे.

टोळीप्रमुख भूषण ऊर्फ स्वप्नील सुनील गोसावी याच्यासह रोहित अशोक पगारे, आयुष फकिरा शिंदे आणि आकाश दीपक गायकवाड या चौघांविरुद्ध मकोकाची कलमे लागू करण्यास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मंजुरी दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रबडी दुकानात धक्कादायक प्रकार; सीताफळाच्या पल्पमध्ये अळ्या, FDA ची कारवाई

पोलिसांच्या माहितीनुसार, भूषण ऊर्फ स्वप्नील गोसावी हा संबंधित टोळीचा प्रमुख आहे. टोळीच्या कथित संघटित गुन्हेगारी कारवाया, आरोपींच्या भूमिका आणि त्यांच्या पूर्वीच्या गुन्ह्यांच्या नोंदी विचारात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात असून, या कारवाईत गुन्हे शाखा, परिमंडळ-२ आणि नाशिकरोड विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790