Amazon

नाशिक: इंदिरानगरमधील सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

नाशिक। दि. १७ ऑक्टोबर २०२६: शहरात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या विठ्ठल आनंदा मते (वय २२, रा. म्हाडा कॉलनी, स्वराज्यनगर, पाथर्डी फाटा) याच्याविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्याला नाशिक शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: वाहनधारकांनी वाहनांचा थकीत कर, पर्यावरण कर व तडजोड शुल्क अदा करावे

गंभीर गुन्ह्यांची नोंद:
मते याच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. साथीदारांसह शस्त्र बाळगून गंभीर दुखापत करणे, खंडणी मागणे, मारहाण करून गंभीर दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करून शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणणे, अशा स्वरूपाच्या आरोपांचा त्यात समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रबडी दुकानात धक्कादायक प्रकार; सीताफळाच्या पल्पमध्ये अळ्या, FDA ची कारवाई

गोपनीय साक्षीदारांच्या माहितीच्या आधारे कारवाई:
मते याच्या कथित गुन्हेगारी कारवायांबाबत दोन गोपनीय साक्षीदारांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने चौकशी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ (१) (ब) अंतर्गत त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शैक्षणिक योजनांच्या लाभासाठी ऑफलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यत मुदतवाढ

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले:
शहरातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासह नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या आणि वारंवार गुन्हे करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. त्यानुसार शहर पोलिसांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कारवाई केली जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790