नाशिक: अपघात झाल्याचा बनाव करीत मित्रांनीच केला युवकाचा खून

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी):  नांदगाव तालुक्यातील साकोरे येथे रविवारी (दि. ७) रात्री एका युवकाचा अपघाताचा बनाव करत त्याच्या मित्रांनीच खून केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये RTOची धडक मोहीम; ४३ हजार वाहनचालकांवर कारवाई

निमतळे शिवारात रात्री दहा वाजेदरम्यान वेहळगाव रस्त्याच्या कडेला एक अनोळखी अपघातग्रस्त युवक पडलेला अॅम्ब्युलन्स चालकाला दिसला, त्याने पोलिस पाटीलला माहिती दिल्यानंतर नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर युवक मृत झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी अधिक तपास केला असता पैशांच्या देवाण- घेवाणीवरून वाद होऊन दोन मित्रांनी त्याचा खून करून अपघाताचा बनाव केल्याचे उघड झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जनगणना 2027 स्वगणनेत नागरिकांनी सहभाग नोंदवावा -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

या घटनेत मोटारसायकलचे कुठलेही नुकसान न होता चालकाच्या डोक्याला दगडाचा मार लागून जागेवरच मयत झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असता सदर व्यक्ती दीपक रमेश कदम (वय ३०, रा. साकोरा) असल्याचे समजले. याप्रकरणी पोलिसांनी योगेश बाळासाहेब पगार व देवाजी दगा बोरसे यांना अटक केली. आर्थिक व्यवहारातून खून केल्याची त्यांनी कबुली दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790