नाशिक: शहरात गांजा विकणाऱ्याला अटक; ४ किलो गांजा जप्त !

नाशिक । दि. १९ जुलै २०२५: शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने गांजा विक्रेत्याला अटक केली असून त्याच्याकडून ४ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. खंडणीविरोधी पथकाने लेखानगर येथे ही कारवाई केली. आकाश बाबू आत्रम (रा. गोंडवाडी फुलेनगर) असे या संशयिताचे नाव आहे.

👉 हे ही वाचा:  इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया; तिसऱ्या फेरीसाठी प्राधान्यक्रमास आजची (दि. २३) मुदत

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पथकाचे पोलीस नाईक भूषण सोनवणे व चारुदत्त निकम यांना माहिती मिळाली की, आकाश आत्रम (वय २८) हा शहरात गुप्तपणे गांजा विक्री करत आहे. पथकाने संशयिताला सापळा रचून अंबड येथील एका हॉटेलजवळून ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या प्लॅस्टिक पिशवीतून ८३ हजार २६० रुपये किमतीचा ४ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. अंबड पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 हे ही वाचा:  राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट…

सदरची कामगिरी सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, दिलीप सगळे, महिला सहायक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक: भुषण सोनवणे, रविंद्र दिघे, मंगेश जगझाप, पोलीस अंमलदार चारूदत्त निकम, भगवान जाधव, भरत राऊत, अनिरूध्द येवले यांनी केलेली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790