नाशिक महानगरपालिकेने कोरोना संदर्भात एक पत्रक जारी केले आहे ते पुढीलप्रमाणे..
दिल्लीतील निजामुद्दिन येथे तबलीकी मरकजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तीमध्ये कोविड-19 आजाराचे काही रुग्ण आढळले असल्याचे विविध माध्यमांद्वारे नागरिकांना माहिती आहे. आपल्या राज्यातील वेगवेगळया जिल्हयात या कार्यक्रमात सहभागी झालेले लोक पोहचले आहेत. सर्व भागामध्ये भेटी देऊन सदर व्यक्ती शोधुन त्यांची वैद्यकिय तपासणी करण्यात येत आहे. या व्यक्तींची कोविड-19 साठी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, कथडा येथे तपासणी केली जाते. अशा धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्यक्तींची तपासणी होऊन कोविड-19 मार्गदर्शक सुचनेनुसार कार्यवाही न झाल्यास अशा व्यक्तींपासुन समाजात कोरोना संक्रमित होण्याची शक्यता आहे.
अद्यापही या कार्यक्रमात सहभागी काही व्यक्तींचा ठाव ठिकाणा लागत नाही. तरी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की, दिल्लीतील निजामुद्दिन येथे तबलीकी मरकजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नाशिक शहरातील अथवा आज रोजी नाशिक शहरात वास्तव्यास असलेल्या ज्या व्यक्तींची वैद्यकिय तपासणी अद्याप झालेली नाही. अशा व्यक्तींनी त्वरीत डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, कथडा, द्वारका, नाशिक (0253-2595049) येथे तपासणी करीता संपर्क साधावा.
तपासणी न झालेली व्यक्ती आढळुन आल्यास अथवा अश्या व्यक्तींची माहिती लपविल्यास सदर व्यक्ती विरुद्ध साथरोग अधिनियम 1897, आय.पी.सी., आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.