नाशिक: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्शवभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहरात डेंग्यू, त्यानंतर झिका व आता देशात कोरोनाचा नवा व्हेरीयंट आढळून आल्याने केंद्राच्या आरोग्य विभागाने राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यासाठी नाशिक महापालिकेचा आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी याबाबत आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात. महापालिकेचे बिटकोत तीनशे व जाकीर हुसैन रुग्णालयात शंभर असे एकूण ४०० बेड असून आवश्यकता वाटल्यास आरटीपीसीआर तपासणी सुरू असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

केरळ राज्यात सोमवारी कोरोनाच्या तब्बल १११ रुग्णांची नोंद करण्यात आल्यामुळे यंत्रणांना धक्का बसला. त्यामुळे कोरोनाचा नवा व्हेरिएंट पुन्हा हातपाय पसरू लागलेला दिसत आहे. यानंतर केंद्रीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, राज्याराज्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. इतकंच नव्हे, तर नागरिकांनाही आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष न करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता कोरोना प्रतिबंधात्मक उपायांवर काम करुन काही नियम आखत पर्यायी व्यवस्था उभ्या कराव्यात. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं कोरोनाच्या धर्तीवर आखून दिलेल्या नियमावलीचं पालन काटेकोरपणे करावं.

हे ही वाचा:  नाशिक: शेल्टर 2024:9000 कुटुंबांनी दिली प्रदर्शनास भेट; 60 कुटुंबांची झाली गृह स्वप्नपूर्ती

सर्दीसह डोकेदुखीचा होतो त्रास:
कोरोनाचा सब-व्हेरिएंट जेएन.१ अखेरच्या काही दिवसांमध्ये समोर आलेला व्हेरिएंट आहे. ज्याचा संबंध सार्स सीओवी-२ च्या बीए. २.८६ (पिरोला) शी जोडला जात आहे. सध्याच्या घडीला अमेरिका, चीन, सिंगापूर आणि भारतामध्ये या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. या संसर्गाच्या लक्षणांमध्ये सर्दी-पडसं, डोकेदुखीचा समावेश आहे. सध्याच्या घडीला या संसगनिं भारतामध्ये हातपाय पसरले नसले तरीही सुरुवातीला या संकटावर मात करण्यासाठी म्हणून आरोग्य यंत्रणा जाणीवपूर्वक कठोर पावलं उचलताना दिसत आहेत. त्याचाच भाग म्हणून नाशिक महापालिकेने वेळीच सतर्क होऊन उपाययोजना करताना दिसत आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

शहरात सध्या डेंग्यू आटोक्यात आहे. झिका संशयित महिलांचे २३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नव्या कोरोना व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर शहरातील आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी देखील काळजी घ्यावी. -डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790