नाशिक (प्रतिनिधी): बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांमुळे गुरुवारी (दि. २७) वातावरणात अचानक परिणाम झाला. फेब्रुवारीतच शहराचे तापमान ३६ अंशांवर गेल्याने नागरिकांची लाहीलाही होत आहे.
गेल्या ३ वर्षांत फेब्रुवारीमध्ये कधीच एवढे चटका देणारे ऊन पडले नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. पुढील दोन दिवसांत पारा ३८ अंशापर्यंत जाण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला असून नाशिक नागपूरपेक्षा तापले आहे.
राज्यात गत दोन दिवसापासुन आकाश कोरडे आणि निरभ्र असल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे कमाल तापमानात देखील वाढ झाली होती. गुरुवारी सकाळपासूनच कमाल तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे उन्हाच चटका जाणवत असतानाच उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. थंडीच्या फेब्रुवारी महिन्यात घरोघरी पंखे आणि एसी लावल्याचे चित्र होते. तर दुपारी २ ते ४ वाजेच्या दरम्यान रस्त्यांवर चांगलाच शुकशुकाट बघायला मिळाला.
![]()


