महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागांत शुक्रवारी (दि. २३ फेब्रुवारी) पाणीपुरवठा बंद राहणार !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगर पालिका हद्दीतील सातपुर विभागातील प्र.क्र.९ कार्बन नाका,कार्बन कंपनी कंपाऊंड वॉलला लगत व श्री छत्रपती शिवाजी महाराज मनपा शाळा अशा एकूण २ ठिकाणी १२०० मी मी व्यासाच्या psc Gravity Mains पाईप लाईन वर गळती सुरु झाल्याने सदरच्या पाईप लाईन दुरूस्तीचे काम तात्काळ हाती घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे सातपुर व नाशिक पश्चिम विभागातील खालील नमूद प्रभागात दुरुस्तीच्या कामाकरिता शुक्रवार २३/०२/२०२४ रोजी सकाळी ९ वाजेपासुनचा पाणी पुरवठा बंद करावा लागेल. तसेच दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्यानंतर शनिवार २४/०२/२०२४ रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. तरी याची नागरिकानी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: नाशिक: शहरातील या महत्वाच्या भागांत आज वाहतुकीस 'नो एंट्री' !

सातपुर विभाग:
१) प्रभाग क्र. ८ –
बळवंत नगर जलकुंभ परिसर, सोमेश्वर कॉलनी ,सुवर्णकार नगर रामेश्वर नगर, बेंडकुळे नगर, पाटील पार्क परिसर, नवशा गणपती परीसर, पाटील पार्क, आनंदवली, सावरकर नगर, पाईपलाईन रोड,काळे नगर, सदगुरु नगर, खांदवे नगर, गणेश कॉलनी, सुयोग कॉलनी, कामगार नगर, गुलमोहर विहार, विवेकानंद नगर, निर्मल कॉलनी, काळे नगर, शंकर नगर, चित्रांगन सोसायटी परिसर, मते नर्सरी रोड परिसर

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

२) प्रभाग क्र.१०- अशोक नगर, जाधव संकुल, समृद्धी नगर, वास्तु नगर, विवेकानंद नगर, पिंपळगाव बहुला गावठाण, राज्य कर्मचारी सोसायटी परिसर, सात माऊली, संभाजी नगर, राधाकृष्ण नगर व इतर परिसर

३) प्रभाग क्र. ११ –प्रबुद्ध नगर व इतर परिसर

नाशिक पश्चिम विभाग:
१) प्रभाग क्र. ७ (भागश:)-
नरसिंह नगर, पुर्णवाद नगर, अरिहंत हॉस्पिटल परिसर, दाते नगर, अयोध्या कॉलनी, तेजोप्रभा आनंद नगर, डि. के. नगर, शांती निकेतन सोसायटी परिसर, आयचित नगर परिसर, चैतन्य नगर परिसर, सहदेव नगर परिसर, पंपींग स्टेशन परिसर, चव्हाण कॉलनी, श्रमिक कॉलनी, माणिक नगर व इतर परिसर सावरकर नगर, दाते नगर, राम नगर, उदय कॉलनी, नेर्लीकर हॉस्पीटल परिसर, जहान सर्कल परिसर…

हे ही वाचा:  नाशिक: घरफोडी करणारी सराईतांची टोळी जेरबंद; २५ तोळे सोन्यासह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त !

२) प्रभाग क्र. १२ भागश:
रामराज्य जलकुंभ परिसर, यशवंत कॉलनी, कल्पना नगर, डिसुझा कॉलनी, कॉलज रोड व इतर परिसर डिसुझा कॉलनी, शिवगीरी सोसायटी, कॉलेज रोड परिसर, एस.टी. कॉलनी परिसर, शहीद चौक परीसर.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790