नाशिक: ‘या’ दिवशी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद…

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिका, नाशिक सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने १६ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहील. तसेच १७ डिसेंबर २०२३ रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदेना म्हटले आहे की, मनपाचे गंगापुर धरण पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील १३२ के.व्ही. सातपुर व महिंद्रा या दोन फिडरवरुन ३३ के.व्ही. एच.टी. वीजपुरवठा घेणेत आलेला असुन सदर पंपिंगद्वारे मनपाचे बाराबंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगीरीबाग, गांधीनगर व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र यांना रॉ. वॉटरचा पुरवठा करणेत येतो.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कार भाड्याने घेऊन परस्पर विक्री; दोन संशयित अंबड गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पाणीपुरवठा नाशिक पश्चिम वितरण विभागास प्रभाग क्र.१२ मधील नविन जलधारा वसाहत येथील २० लक्ष लिटर जलकुंभास बाराबंगला जलशुध्दीकरण केंद्राचे आवारातुन जोडणी करणे, विसेमळा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ रोड १२०० मि मी पीएससी ग्रॅव्हीटी मेन रॉ वॉटर पाईपलाईन वरील पाणी गळती बंद करणे, शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथे एमबीआर लाईनवर फ्लो मीटर बसविणे व पाणीपुरवठा वितरण विभागातील विविध ठीकाणचे दुरुस्तीकामे करणे इ. कामे करावयाची आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आजपासून (दि. १२ मार्च) ‘कृषी कुंभ’ प्रदर्शन

तसेच मनपाचे मुकणे रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड सबस्टेशन गोंदे येथुन एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी ३३ के.व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे. सदरचे महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशनमध्ये २२० केव्ही सीटी टेस्ट करणे, सर्व इनसुलेशन क्लिनिंग व इतर अनुषंगिक काम इ. कामे करणेकरीता शनिवार दिनांक दि. १६/१२/२०२३ सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपावेतो पॉवर सप्लाय बंद ठेवणेबाबत मागणी केली आहे. त्यामुळे गंगापुर धरण व मुकणे धरण येथुन सदर कालावधीत पंपीग करता येणार नसल्याने दरम्यान मनपाचे सर्व जलशुध्दीकरण केंद्र बंद राहणार असल्याने संपूर्ण नाशिक शहरास पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही.

🔎 हे वाचलं का?:  मार्चच्या अवघ्या १२ दिवसांतच नाशिकचा पारा ३८ अंशांपार; दशकातील पहिली नोंद

तरी शनिवार १६/१२/२०२३ रोजी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहील. तसेच रविवार १७/१२/२०२३ रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे म्हटले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790