नाशिक। दि. १८ सप्टेंबर २०२५: स्मार्ट सिटी कंपनीमार्फत फ्लोमीटर बसविण्याची कामे तसेच मनपा पाणीपुरवठा विभागामार्फत देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने शनिवार, दि. २० सप्टेंबर रोजी नाशिक शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच रविवार, दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे मनपाने कळविले आहे.
⚡ या कामामुळे पाणीपुरवठा राहणार बंद:
👉 नाशिक पूर्व : प्रभाग १४: कालिका जलकुंभ ५०० मि.मी. व्यासाच्या गुरुत्व वाहिनीचे काम., प्रभाग २३ अशोक शाळा समोरील ४०० मि.मी. व्यासाच्या वितरण वाहिनीवर नवीन एअर व्हॉल्व्ह बसविणे, गांधीनगर जलकुंभ १,२,३, ४ वरील वितरण वाहिनीवर व्हॉल्व्ह व फ्लो मीटर बसविणे.
👉 नाशिकरोड : भीमनगर जलकुंभ १ : इलनेट व्हॉल्व्ह, फ्लो मीटर व आउटलेट व्हॉल्व्ह व फ्लो मीटर दुरुस्ती, जलकुंभ दोनवर इलनेट व्हॉल्व्ह, फ्लो मीटर दुरुस्ती.
👉 शिवशक्तीनगर जलकुंभ : इलनेट व्हॉल्व्ह, फ्लो मीटर दुरुस्ती करणे.
👉 पवारवाडी जलकुंभ १ : व्हॉल्व्ह, फ्लो मीटर दुरुस्ती करणे. जलकुंभदोनवर व्हॉल्व्ह दुरुस्ती.
👉 नवीन नाशिक विभाग : भवानीमाता जलकुंभाचे काम. सातपूर : १२०० मी.मी. व्यासाच्या पाइपलाइनवर तीन ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
![]()

